Shreenamdev, Jani Aani Nagari| श्रीनामदेव, जनी आणि नागरी

  • ₹170/-

  • Ex Tax: ₹170/-

विठ्ठलभक्तीची महाराष्ट्रातली परंपरा श्रीनामदेवांचे त्रिविध प्रकारचे ऋण वागवणारी आहे. त्यांनी इथल्या वैष्णवभक्तीला मायलेकरांच्या नात्याचा वत्सल रंग दिला. त्या भक्तीला हरिकीर्तनाची जोड दिली आणि वारकरी कीर्तन परंपरेचे ते प्रवर्तक ठरले. त्याचबरोबर कमालीच्या राजकीय-सामाजिक अस्थिरतेच्या काळात त्यांनी वारकरी संप्रदायाची पताका थेट पंजाबात नेऊन उभवली. या त्यांच्या कार्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या चरित्रासंबंधीच्या काही समज-अपसमजांचा परामर्श घेण्याचा आणि त्यांच्या वाङ्‌मयीन कार्याचा मागोवा घेण्याचा इथे प्रयत्न केला आहे. जनी ही नामयाची दासी म्हणूनच महाराष्ट्रासमोर आली आहे. तिचे लौकिक आणि वाङ्‌मयीन चरित्र इथे उलगडून पाहिले आहे. नागरी ही नामदेवांची पुतणी. तिच्या आत्मकथनपर अभंगांमधून तिची ओळख प्रथमच घडवली गेली आहे. मराठीतील नामदेव आणि नामदेव परिवार यांच्याविषयीच्या साहित्यात ही लहानशी पण लक्षवेधी भर आहे. 

Write a review

Please login or register to review