Trividha |त्रिविधा

  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-

प्राचीन मराठी साहित्य हे मुख्यत: विविध धर्मसंप्रदायांनी निर्माण केलेले साहित्य आहे. शैव आणि वैष्णव परंपरांमधील विविध संप्रदायांचे अनेक अनुयायी जसे भक्त होते तसे ग्रंथकारही होते. त्याशिवाय गाणपत्य आणि जैन ग्रंथकारांनीही प्राचीन मराठीचे वैभव वाढवले आहे. या ग्रंथकारांचा आणि त्यांच्या ग्रंथकृतींचा परिश्रमपूर्वक मागोवा घेणारा हा लेखसंग्रह म्हणजे प्राचीन मराठी साहित्याकडे पाहण्याची वाचकांची, अभ्यासकांची आणि संशोधकांचीही दृष्टी विस्तारण्याचा प्रयत्न आहे. अनेक अल्पज्ञात आणि काही अज्ञात ग्रंथकारांच्या लेखनकर्तृत्वाकडे लक्ष वेधून महाराष्ट्राच्या धर्मेतिहासाचा उलगडा करण्याची शोधपूर्वक धडपड या संग्रहातून केली आहे. प्राचीन मराठी साहित्याच्या सामर्थ्याची, सौंदर्याची आणि भक्तिभावनेच्या अखंड सूत्राची जाणीव या निमित्ताने वाचकांना होईल आणि त्या साहित्याच्या अभ्यासाच्या साधनांचे महत्त्वही त्यांच्या मनात अधोरेखित होईल.

Write a review

Please login or register to review