Dakshinecha Lokdev Khandoba |दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा
- Author: Dr. R. C. Dhere |डॉ. रा. चिं. ढेरे
- Product Code: Dakshinecha Lokdev Khandoba |दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा
- Availability: In Stock
-
₹350/-
- Ex Tax: ₹350/-
महाराष्ट्रात खंडोबा या लोकप्रिय नावाने ओळखला जाणारा हा मूळचा धनगर - कोळी - रामोशी या जनजातींचा देव जसा सर्व मराठी समाजाने आपला मानला,तसाच कर्नाटक -आंध्रात मैलार -मल्लण्णा या नावांनी ओळखला जाणारा हा देव कुरूब या पशुपालक समाजाबरोबरच तिथल्या बहुजणांनी प्रेमाने स्वीकारला.
डॉ. रा. चिं. ढेरे यांनी 'खंडोबा' या ग्रंथात चार दशकांपूर्वीच मराठीत देवता विज्ञानाचे सैद्धातिक पायाभरण केले आणि देवतांच्या विकसन- प्रतिकियेचा उलगडा करण्याचा वस्तुपाठ सिद्ध केला. अशा विषयांचा अभ्यास क्षेत्रात स्थल- पूराणातील साधन सामग्री कशी उपयुक्त ठरते , हेही त्यांनीच प्रथम 'खंडोबा'च्या निमित्ताने साधार दाखवून दिले