माणसाला जगण्यासाठी नेमकं काय लागतं?
पैसा? प्रेम? स्वातंत्र्य? एकांत? की स्वतःच्या आयुष्याची सूत्रं स्वतःच्या हातात असल्याची जाणीव?
पात्रिस मर्सोच्या आयुष्यातला एक अनपेक्षित प्रसंग त्याला या प्रश्नांसमोर उभं करतो. तिथून सुरू होतो
एका तरुणाचा स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रवास-सुखाच्या शोधातून मृत्यूच्या स्वीकारापर्यंत जाणारा.
मृत्यूची जाणीव जर सतत सोबत असेल, तर आपण अधिक अर्थपूर्णपणे जगू शकतो का? सुख म्हणजे नेमकं काय?
आणि स्वतःच्या अटींवर जगणं शक्य आहे का?
काम्यूच्या साहित्यविश्वातील ही आरंभीची कादंबरी पुढे लेत्राँजे, ला पेस्त आणि ला मिथ द सिसीफमध्ये अधिक
सखोल होणार्या विचारांची चाहूल देते. भूमध्य समुद्राचा प्रकाश, शरीराला जाणवणारं जीवन,
एकाकीपणाची जाणीव आणि मृत्यूची सावली यांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक माणसाच्या जगण्याच्या मूलभूत प्रश्नांकडे नव्याने पाहते.
मृत्यूबद्दलची ही कादंबरी खरं तर जगण्याबद्दल आहे-
आणि कदाचित सुखी जगण्याबद्दलही.