Tivra Madhyam | तीव्र मध्यम
- Author: Vidur Mahajan | विदुर महाजन
- Product Code: Tivra Madhyam | तीव्र मध्यम
- Availability: In Stock
-
₹150/-
- Ex Tax: ₹150/-
अधांतरी मन:स्थिती, सततची अस्वस्थता,
विचारांची उलघाल आणि काहीतरी न सापडण्याची सततची जाणीव...
स्वरसान्निध्याच्या सवयीमुळे असेल कदाचित, या
काव्यसंग्रहास शीर्षक द्यायचे मनात आल्यावर ‘पंचम’ ह्या निर्मितीच्या स्वराजवळ
असलेला, ‘तीव्र मध्यम’ हा काव्यलिखाणातील भाव-अभिव्यक्तीचा
स्वर आहे असे जणू मनात झंकारले! आणि हेच नाव द्यायचे ठरले!
माझ्या काव्यसंग्रहाचा जणू हाच वादी स्वर! राग संगीतात या स्वरावर
न्यास नाही त्यामुळे तो कुठल्याच रागाचा वादी-स्वर नाही!
पण संगीतापेक्षा मोठे जगणे! अन् श्वास आहे, तोवर
न्यास कशाला? इतर सारेच स्वर-अनुवादी... जगण्याच्या मांडणीत
वर्ज्य स्वर कुठलाही कसा असेल?
शोध इथला संपत नाही... हेच खरे!
विदुर महाजन

