Satpudyacha Satbara | सातपुड्याचा सातबारा
- Author: Kishor Rithe|किशोर रिठे
- Product Code: Satpudyacha Satbara | सातपुड्याचा सातबारा
- Availability: In Stock
-
₹950/-
- Ex Tax: ₹950/-
सातपुडा पर्वत हा हिमालयापेक्षाही पुरातन आहे.
म्हणूनच त्याच्या केवळ शे-दीडशे
वर्षांच्या इतिहासाबाबत बोलणे म्हणजे त्याच्यावर
अन्याय करण्यासारखे होईल.
‘सातपुड्याचा सातबारा’ या पुस्तकात सातपुड्याचा केवळ पुरातन
इतिहास नाही,
तर येथील वन्यजीवन व निसर्ग संपन्नता या दोन्ही
अंगांवर किशोर रिठे यांनी सखोल प्रकाश
टाकला आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये येथे अनेक
सत्तांतरे झाली. सातपुड्यातील
वन्यजीवन व निसर्ग संपन्नता यावर या सर्वांचा बरावाईट
परिणाम झाल्याचे या पुस्तकात
दिसून येते.
अमेरिकेतील सिएटल राज्याच्या ग्रेट रेड चीफला जे सन 1855 साली उमगले ते मध्य
भारतामधील सत्ताधीशांना दोन ते तीन हजार वर्षांपूर्वी
कळले होते; परंतु त्यानंतर आलेल्या
अनेक सत्ताधीशांना आम्ही या धरतीची लेकरे आहोत, मालक
नाहीत या तत्त्वज्ञानाचा
विसर पडला. त्यामुळे सातपुड्याची अधोगती झाली.
प्राचीन लेणी, शैलचित्र, शिलालेख,
ताम्रपत्र व त्यानंतर कागदांवर उतरवलेले वेद, पुराण
सातपुड्याची संपन्नता तसेच अधोगती
या दोन्हीची साक्ष देतात. या पुस्तकात हा सर्व ऊहापोह
केला आहे. सोबतच हुमायुन,
रुडयार्ड किपलिंग व कॅप्टन फोर्सीथ या लेखकांच्या
साहित्यातील बोलके संदर्भ आहेत.
मागील तीस वर्षांमध्ये सातपुडा पर्वत रांगेतील
संवर्धन कामांचा स्वत: साक्षीदार राहिल्याने
लेखकाने हा घटनाक्रम खूपच जिवंत नोंदविला आहे.
सातपुडा पर्वताला समर्पित असे हे
पहिले पुस्तक असावे. त्याकडे निसर्ग इतिहासाचा संदर्भ
ग्रंथ म्हणूनही पाहिले जाईल.

