Lokarangabhumi | लोकरंगभूमी
- Author: Santosh Shenai |संतोष शेणई
- Product Code: Lokarangabhumi | लोकरंगभूमी
- Availability: In Stock
-
₹450/-
- Ex Tax: ₹450/-
लोकरंगभूमी हे लोकसंस्कृतीचं
दर्शन आहे आणि
या लोकसंस्कृतीचं आदिमूळ आदिम मानवी समूहांपर्यंत
पोचलेलं आहे. निसर्गनिर्भर आदिमानवाचे हळूहळू समूह होत गेले.
त्या वेळी कधी आनंदाच्या क्षणी,
तर कधी भयकाळात
त्याच्याकडून काही आविष्कार होत
गेला.
त्याला आकार मिळत गेला. ती लोककलांची सुरुवात होती.
श्रमसौख्यासाठी लोककला येथे
सुरू झाली. नैसर्गिक घटनांच्या
भीतीतून त्यावर मात करण्यासाठी
यातुविधी निर्माण झाले.
यातुशक्तींना प्रसन्न
करण्यासाठी आपल्या कलांचा उपयोग
करताना माणसाने आपल्या कला
यातुविधींशी जोडल्या.
आपल्या बहुतांश लोककला
यातुविधींशी संबंधित असल्या तरी
त्या यातुविधींआधी अस्तित्वात
आल्या आहेत.
लोकजीवनाच्या स्थितिगतीबरोबर त्या विकसित झाल्या आहेत.
त्यातील रंजनात्मकता अधिक
वाढली. त्या अधिक सुडौल झाल्या.
पिढ्यान्पिढ्या त्या सादर
केल्या गेल्याने त्यात वारसा,
परंपरा आणि निष्ठा जोपासली
गेली. महाराष्ट्रभरातील अशा
लोककलांचा व त्याच्या आधुनिक
रूपांचा अभ्यासकांनी
या ग्रंथात मागोवा घेतला आहे.

