Kautilyapranit Sushasan Aani Prashasan Tantra | कौटिल्यप्रणीत सुशासन आणि प्रशासन तंत्र
- Author: Dr. Kirti Ram Pinjarkar | डॉ. कीर्ती राम पिंजरकर
- Product Code: Kautilyapranit Sushasan Aani Prashasan Tantra
- Availability: In Stock
-
₹600/-
- Ex Tax: ₹600/-
कौटिल्य हा प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटलचा समकालीन होता. अॅरिस्टॉटलला पाश्चिमात्य विचारवंतांत
‘राज्यशास्त्राचा जनक’ मानले जाते. त्याने राज्यशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा दिला व त्याचे 'Politics’ प्रसिद्ध केले.
त्याचाच समकालीन कौटिल्य याने ‘अर्थशास्त्र’ लिहून त्यातूनच राजकीय विचार स्पष्ट केले. अॅरिस्टॉटलपेक्षा
कौटिल्याने राजकीय विषयाचा व्यापक विचार केला. कौटिल्याने अॅरिस्टॉटलसारखे गुलामगिरीच्या प्रथेचे समर्थन
कधीच केले नाही. या उलट समाजरचनेच्या तत्कालीन उतरंडीच्या निम्नस्तरावरील लोकांची विशेष दखल घेऊन
त्यांच्यासाठी निरनिराळे उद्योग उपलब्ध करून, त्यांचे जीवनमान अधिक चांगले करण्याच्या योजना
कौटिल्याने केल्या. त्याच्या अर्थशास्त्रातील या गोष्टींचे आपल्या ग्रंथात डॉ. कीर्ती राम पिंजरकर यांनी विशेषत्वाने
विश्लेषण केलेले आहे.
प. सि. काणे
Tags: Kautilyapranit Sushasan Aani Prashasan Tantra | कौटिल्यप्रणीत सुशासन आणि प्रशासन तंत्र

