Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Tya Madhyaratreenantar...|त्या मध्यरात्रीनंतर...
  • Tya Madhyaratreenantar|त्या मध्यरात्रीनंतर

Tya Madhyaratreenantar|त्या मध्यरात्रीनंतर

  • ₹600/-

  • Ex Tax: ₹600/-

पाणी माणसाचं जीवन फुलवतं आणि
महापुरात रूपांतर झालं की,
ते सारं विध्वंस करून टाकतं.
दोन्ही काठांवर वर्षानुवर्षं पसरलेली संस्कृती
महापूर गिळंकृत करून टाकतो.
माणसाला निराधार, अगतिक करतो.
महापूर हातात सापडत नाही,
दोन श्वासांच्यामध्ये मावत नाही, तो चक्रावून टाकतो.
तरी तो महापूर शब्दांत पकडण्याचा जोरदार व
यशस्वी प्रयत्न लक्ष्मीकमल गेडाम यांनी
त्यांच्या ‘त्या मध्यरात्रीनंतर...’ या कादंबरीत केला आहे.
या कादंबरीत काडी काडी विस्कटून टाकणारा महापूर आहे.
जुनी नाती वाहून जाताना नवी नाती उगवलेली आहेत.
जगण्याच्या स्पर्धेतून आलेली विकृती आहे.
करुणा अन् क्रूरता आहे. शिष्टाचाराबरोबर भ्रष्टाचारही आहे.
माणसाच्या क्षुद्रतेची जाणीव आहे.
लक्ष्मीकमल गेडाम यांनी सर्वतोपरी महापूर पकडण्याचा यत्न
या कादंबरीत केला आहे. महापुराच्या कराल दाढेतून
सुटका करून घेण्याची धडपड, नंतर जीवनाचा
नवा डाव मांडण्याची धडपड, शासन, समाज,
विविध संघटना यांच्या विधायक व विघातक हालचाली,
आकाशाचा थरकाप उडवणारा आक्रोश, माणसाच्या स्वप्नांचा
चक्काचूर या कादंबरीत आला आहे.
महाआपत्तीचं चित्रण करणारी ही कादंबरी निश्चितच
स्वतःची ओळख निर्माण करेल.
  -- उत्तम कांबळे (पूर्वाध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन, ठाणे)

Write a review

Please login or register to review

Tags: Tya Madhyaratreenantar...|त्या मध्यरात्रीनंतर...