Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Sahityache Ihwadi Saundaryashastra | साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र

Sahityache Ihwadi Saundaryashastra | साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र

  • ₹230/-

  • Ex Tax: ₹230/-

साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्रया पुस्तकात यशवंत मनोहर यांनी वर्चस्ववाद्यांची शोषणमूल्ये आणि सर्वच माणसांना शोषणमुक्त करणारी इहवादी मूल्ये यांच्यातील आरपारचा संघर्ष मांडला आहे. शिवाय याही संघर्षाचे सीमोल्लंघन करणारे, जीवनातील आणि साहित्यातीलही असुंदराला सौंदर्यमय करणारे सिद्धांतनही त्यांनी या पुस्तकात केले आहे.

इहवादी नीती विषमतेला आणि शोषणाला असभ्यता हेच समर्पक नाव देते. या असभ्यतेची निर्मिती, तिचे समर्थन वा तिच्यासंबंधीचे मौन या सर्वच गोष्टी एका असंस्कृत राजकारणाचाच भाग असतात. ईश्वरसत्ताक, दैवसत्ताक, मूलतत्त्वसत्ताक, पुरुषसत्ताक, विषमतासत्ताक, शोषणसत्ताक वा असत्यसत्ताक अशी सर्व सत्ताके त्या हिंस्र राजकारणाचाच आविष्कार असतात. हे सर्व श्रेण्यांचे राजकारण उद्ध्वस्त करणारे सर्वच माणसाच्या समान सन्मानाच्या सौंदर्याचे राजकारण यशवंत मनोहरांनी या पुस्तकात उभे केले आहे. या विज्ञानशील, सर्वहितैषी आणि भेदातीत सिद्धांतनाला कोणत्याही लोकसमूहाचे नाव देण्यापेक्षा त्यांनी एकूणच जगातील इहवादी तत्त्वज्ञानछावणीचे नाव दिले आहे. इतर अस्मितांपेक्षा ही तत्त्वज्ञानिक आणि वैश्विक अस्मिता अधिक विधायक ठरू शकते. या पुस्तकातील सिद्धांतन जाणकार वाचकांना सौंदर्यविषयक निर्णायक बिंदूवर घेऊन जाईल, ही खात्री आहे

Write a review

Please login or register to review

Tags: Sahityache Ihwadi Saundaryashastra | साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र