Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Sea of Poppies | सी ऑफ पॉपीज

Sea of Poppies | सी ऑफ पॉपीज

  • ₹650/-

  • Ex Tax: ₹650/-

इबिसहे एक विशाल जहाज आहे. हिंदी महासागरातील मॉरिशियस बेटाकडे जाणार्या या जहाजामध्ये नाविक आहेत, फरार निर्वासित आहेत, कामगार कैदी आहेत. एकोणिसाव्या शतकातील वसाहतवादाच्या काळात नियती काही भारतीय पाश्चिमात्य मूळ असलेल्या, विविध क्षेत्रांतील लोकांना या जहाजावर एकत्र घेऊन येते - त्यात एक कंगाल राजा आहे, खेड्यातील एक विधवा स्त्री आहे, गुलामीतून मुक्त झालेला अमेरिकन आहे स्वच्छंद, मनस्वी, अनाथ युरोपियन मुलगी आहे. प्रत्येक जण अफूयुद्ध त्यातून घडणारे राजकारण यांनी या ना त्या पद्धतीने होरपळलेला आहे. हुबळीहून हे समुद्रयात्रेला निघतात तेव्हा पूर्णपणे भिन्न असलेले त्यांच्या पूर्वायुष्यातील बंध पुसून जातात ते सहप्रवासी म्हणून जवळ येतात. सर्वांची एकच मनीषा असते - दूरवरच्या बेटावर जाऊन एक नवे आयुष्य सुरू करायचे. एका नव्या वंशाची सुरुवात!

सी ऑफ पॉपीजही कादंबरी आपल्याला गंगेकाठच्या अफूच्या शेतातून पुढे नेत चीनचे सुंदर रस्ते उफाळणारा समुद्र असा विस्तारपूर्ण प्रवास घडवते. वसाहतवादी साम्राज्यवादी प्रवृत्तीतून चीन ब्रिटिश यांच्यात झालेले अफूचे युद्ध; या युद्धाचा दाह, झळ बसलेल्या लोकांतून यातील पात्रे उभी राहिली आहे. त्यांच्या संवेदना, त्यांचे भौतिक / सांसारिक संबंध त्यांच्याकडून होणारा प्रतिरोध यांमुळे ही कादंबरी जिवंत बनते. अमिताव घोष यांचे थोर कादंबरीकार म्हणून सामर्थ्य सिद्ध होते, ते यामुळे!

सन्मान : मॅन बुकरह्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी दोनदा नामांकन. साहित्य अकादमी आता घोषित झालेला ज्ञानपीठपुरस्कार. याप्रमाणेच भारत सरकारने अमिताव घोष यांचा पद्मश्रीदेऊन यापूर्वीच गौरवही केला आहे.

Write a review

Please login or register to review

Tags: Sea of Poppies | सी ऑफ पॉपीज