Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Anil Vishwas |अनिल विश्वास

Anil Vishwas |अनिल विश्वास

  • ₹260/-

  • Ex Tax: ₹260/-


अनिल विश्वास हे नाव असंख्य सिनेरसिकांच्या डोळ्यात, कानात, मनात आणि हृदयात कायमच अटल स्थानी आहे. पडद्यावर आणि पडद्यामागील सर्व भूमिका आपल्या प्रातिभ आविष्काराने त्यांनी अविस्मरणीय केलेल्या आहेत.

चित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या काळातील त्यांच्या संगीत, गायन, अभिनय, कथा, पटकथा, दिग्दर्शन, निर्मिती अशा चौफेर व अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास अनिलदां शिवाय लिहिता येत नाही.

विद्यार्थिदशेतच ते स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय झाले. कारावासही भोगला. त्या गोष्टींचा आणि त्यांच्या साम्यवादी विचारांचा प्रभाव त्यांच्या सर्व कलानिर्मितीत व व्यक्तिगत जीवनशैलीवर दिसतो. ह्या पार्श्वभूमीवर त्यांचे जीवन चरित्र जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

आजही अनिलदा म्हणजे एक चमत्कारच वाटतो. हे चरित्र म्हणजे केवळ आपल्या स्मृती ताज्या व टवटवीत करण्यापुरते मर्यादित नाही, तर यात त्यांची संगीत आराधना आणि भारतीय फिल्म-संगीताची विकासयात्राही आहे.

Write a review

Please login or register to review