Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Ghar Sainikache |घर सैनिकाचे

Ghar Sainikache |घर सैनिकाचे

  • ₹300/-

  • Ex Tax: ₹300/-

लष्करातील सैनिक अथवा अधिकार्‍याबरोबरचे विवाहोत्तर सहजीवन म्हणजे नेहमीप्रमाणे होणारा संसारनसतो. अशा स्त्रीला तिच्याभोवतीचे सतत बदलणारे वातावरण, समाज आणि राष्ट्र यांच्याशी एकरूप होताना कसरत करावी लागते. बदल्यांमुळे वेगवेगळी लष्करी केंद्रे, प्रदेश, भाषा, धर्म, वंश, संस्कृती समजून घेताना आपल्या कुटुंबाला प्रथम समजून घेत

पुढे जात राहावे लागते. नीलिमा निशाणदार यांनी अनुभवलेले हे लष्करी जीवनातील आपले घर, संसार, कुटुंब येथे चित्रित केले आहे; पण त्याही पुढे जाऊन त्यांनी स्वत:चा आत्मशोध घेतला आहे. यापूर्वी मराठीत स्त्रियांची अनेक आत्मकथने आली आहेत; परंतु त्यात लष्करी जीवन आले नाही. लष्करातील माणसाच्या पत्नीने लिहिलेले हे पहिलेच आत्मकथन असावे. संरक्षण सेवेतील आपली नोकरी चोख बजावणार्‍या सैनिकांच्या गृहिणींना, कुटुंबाला कोणत्या प्रकारच्या जीवनाला, अनुभवाला सामोरे जावे लागते, हे जाणून घेण्यासाठी हे आत्मकथन जरूर वाचावे. वाचता वाचता ते घर आपलेच बनते याचा प्रत्यय येईल.

Write a review

Please login or register to review