Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 bandhutech jhad| बंधुतेचं झाड
  • bandhutech jhad| बंधुतेचं झाड

bandhutech jhad| बंधुतेचं झाड

  • Product Code: bandhutech jhad| बंधुतेचं झाड
  • Availability: In Stock
  • ₹300/-

  • Ex Tax: ₹300/-

  बंधुतेचं झाड' हे उद्धव कानडे या प्रसिद्ध कवीवरच्या प्रेमापोटी लिहिलेले प्रांजळ आणि मनोज्ञ असे विवेचन आहे. ते राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून आणि आधीही बंधुता हा उद्धव कानडेंच्या विचारयात्रेचा मध्यबिंदू राहिलेला आहे. मूल्यत्रयींपैकी बंधुता नसेल तर स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांना काही अर्थच उरत नाही. म्हणजे उद्धव कानडे हे नुसते कवी म्हणूनच नाही तर विचारवंत म्हणूनही लेखकाला भावलेले आहेत. कवी, माणूस आणि विचारवंत म्हणून भेटलेल्या उद्धव कानडेंचे या पुस्तकात घडणारे दर्शन मोठेच विलोभनीय आहे. लेखक तर्ककर्कशतेच्या दृष्टिकोनातून कानडेंकडे पाहत नाही, तर भावनेने ओथंबलेल्या उत्कट मैत्रभावातून तो कानडेंना पाहतो. हेच या पुस्तकाचे सूत्र आहे. निर्मळ प्रेम करणारा डॉ. मलघेंसारखा असा गोड माणूस उद्धव कानडेंना भेटला याचा मला हेवा वाटतो.

कवींचे तीन प्रकार कुणी तरी सांगितलेले आहेत. एक जे चांगली कविता लिहितात पण त्यांना कविता चांगली वाचता येत नाही. दुसरा प्रकार ज्यांची कविता सामान्य असते पण त्यांचे वाचन फारच प्रभावी असे असते. तिसरे उदाहरण जे कविताच जगतात उदा. डॉ. बाबा आमटे, डॉ. अभय बंग, उद्धव कानडे हे तिन्ही प्रकार एकवटलेले कवी आहेत. ते चांगली कविता लिहितात, कवितेचे प्रभावी वाचन करतात आणि मी जवळून पाहिलेले त्यांचे जगणेही एक कविताच आहे. डॉ. संभाजी मलघे या लेखकानं, कवीनं उद्धव कानडे यांच्या कवितेवर, विचारांवर निस्सीम प्रेम केले आहे. यापुढेही असेच प्रेम करत राहा. डॉ. संभाजी मलघे यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने हा वैचारिक ग्रंथ साकारला आहे. मी त्यांचे स्वागत करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छाही देतो.

प्रा. विश्वास वसेकर 

Write a review

Please login or register to review

Tags: bandhutech jhad| बंधुतेचं झाड