Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Trutiyapurushi Shunya Vachani| तृतीयपुरुषी शून्य वचनी

Trutiyapurushi Shunya Vachani| तृतीयपुरुषी शून्य वचनी

  • ₹210/-

  • Ex Tax: ₹210/-

तृतीयपुरुषी शून्य वचनीएक वास्तववादी कादंबरी आहे. तृतीयपंथीयांचा जीवनप्रवास या कादंबरीमध्ये लेखकाने मांडला आहे. कादंबरी वाचताना आपण त्यांच्या जगात हरवून जातो. समलिंगी असलेले, हिरा नावाचा जोगताआणि कस्तुरी नावाची तृतीयपंथीयया दोघांची एक जगावेगळी प्रेमकहाणी या कादंबरीमध्ये लेखकाने अतिशय कुशलतेने मांडली आहे. या दोघांचे प्रेमप्रकरण, त्यांचे वास्तव जगणे, त्यांचा उदर-निर्वाह, त्यांची संस्कृती, त्यांचा देवा-धर्मावरचा अतूट विश्वास, त्यांचे उत्सव, शिवाय त्यांचा जन्म-मरण आणि पोटाची खळगी भरण्यासाठी जीवनसंघर्ष, सर्वच काही थरारक... मन हेलावून टाकणारे प्रसंग वाचून आपण एक वास्तव चित्रपटच पाहतो आहे असे वाटते. सूर्यकांत तिवडे स्वत: नाटककार आणि चित्रपट दिग्दर्शक असल्याने कादंबरी चित्रमय झाली आहे. कादंबरी वाचकांना अंतर्मुख करते.

Write a review

Please login or register to review