India : A Linguistic Civilization | इंडिया : ए लिंग्विस्टिक सिव्हिलायझेशन
- Author: Dr. Ganesh Devy | गणेश देवी
- Product Code: India : A Linguistic Civilization | इंडिया : ए लिंग्विस्टिक...
- Availability: In Stock
-
₹450/-
- Ex Tax: ₹450/-
भारतीय संस्कृतीचे सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण
म्हणजे
तिची भाषिक विविधता. आपल्या भाषा या हजारो वर्षांच्या
मानवी चिंतन, अनुभव आणि सांस्कृतिक
संचिताचे
भव्य भांडार आहेत. ‘भारताची संकल्पना’ समजून घेताना
भाषेचा
तिच्या केंद्रस्थानी असलेला सहभाग प्रकर्षाने जाणवतो.
तथापि, भारतीय भाषांची
उत्क्रांती मांडणे हे अत्यंत आव्हानात्मक
कार्य आहे, कारण भूतकाळात
अस्तित्वात असलेल्या आणि
आजही प्रचलित असलेल्या भाषांची संख्या इतकी अफाट आहे
की,
त्यांचा एकच ठोस उगमबिंदू सांगणे किंवा त्यांचा
संपूर्ण इतिहास
पुनःनिर्मित करणे अत्यंत कठीण आहे.
अशा पार्श्वभूमीवर या लक्षणीय आणि परिवर्तनकारी पुस्तकामध्ये,
ख्यातनाम अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी भारताच्या
भाषिक भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचे
गूढ आणि सूक्ष्म पैलू
उलगडले आहेत. मानववंशाच्या इतिहासाच्या विस्तीर्ण
पटलावर
भारतीय भाषांची उत्पत्ती आणि वाढ यांचा मागोवा घेताना
स्थलांतर, शेती, वसाहतींच्या नवीन पद्धती, धार्मिक संप्रदायांची
स्थापना, सांस्कृतिक प्रतिकार,
तसेच ब्रिटिश वसाहतीराजसारख्या
घटकांचा वेध घेत आपल्या भाषिक वारशाच्या घडणीला
अभिव्यक्त केले आहे. भाषा, ओळख,
राजकीय भान यांच्या
परस्परसंबंधांचे सखोल चिंतन डॉ. देवी या पुस्तकात
करतात आणि
दुर्बल, उपेक्षित व आदिवासी
समुदायांच्या संकटग्रस्त भाषांचे जतन
ही एक सामूहिक जबाबदारी असल्याचा ठाम संदेश देतात.
Tags: India : A Linguistic Civilization | इंडिया : ए लिंग्विस्टिक सिव्हिलायझेशन

