• Sarjanshodhachya Paulkhuna | सर्जनशोधाच्या पाऊलखुणा

Sarjanshodhachya Paulkhuna | सर्जनशोधाच्या पाऊलखुणा

  • ₹360/-

  • Ex Tax: ₹360/-

ललित साहित्यकृतीच्या निर्मितीत अगदी स्वाभाविकपणे कार्यरत होणारा निर्णायक 

घटक म्हणजे लेखकाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व. मूळचा पिंडधर्म, परिस्थिती, संस्कार

प्रेरणास्थाने, अभिरुची, स्मृती आणि आदर्श इत्यादी अनेक ज्ञात व अज्ञात घटकांच्या 

संपृक्त रसायनाने आकारास आलेले वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व लेखकाच्या निर्मितीवर 

प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे आपले स्वामित्व गाजवित असते.


लेखकाच्या अंतरंगात शिरून अतिशय सहृदयतेने आणि सखोलपणे घेतलेली मुलाखत 

ही त्याच्या लौकिक आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाच्या शोधाचे विश्वसनीय आणि
मौलिक साधन होय.


कुसुमाग्रज, सुर्वे, भट, ग्रेस व एलकुंचवार या ख्यातकीर्त प्रतिभावंतांच्या डॉ. काळे 

यांनी घेतलेल्या या प्रदीर्घ मुलाखती रूढ पद्धतीने घेतल्या जाणार्‍या मुलाखतींचा 

क्षेत्रपरीघ अधिक रुंदावत नेणार्‍या आणि त्या त्या साहित्यिकाच्या सर्जनशीलतेच्या 

पाऊलखुणा सूक्ष्मपणे टिपणार्‍या आहेत.


या विस्तृत मुलाखतींच्या दरम्यान हे प्रतिभावंत आणि मुलाखतकार ह्यांच्यातील 

वाढत गेलेल्या हृदयसंवादामुळे ज्ञानेश्वरांनी निर्देशिलेल्या, ‘संवादाचा सुवावो ढळे ।
तर्‍ही हृदयाकाश सारस्वत वोळे’ या अपेक्षेची प्रचिती तर इथे येईलच, पण त्या 

बरोबरच आपल्या अलौकिक प्रतिभाधर्मामुळे साहित्याचे मानदंड ठरलेल्या या 

वाङ्मयकारांशी निस्सीम तादात्म्य साधून परिश्रमपूर्वक केलेल्या शोधसंपन्नतेमुळे 

त्यांच्या मनश्चरित्राच्या आणि निर्मितिप्रक्रियेच्या दुर्गम भासणार्‍या आकलनवाटा सुगम 

होतील. स्वाभाविकच त्यांच्या व्यामिश्र निर्मितीचा प्रत्यय, आस्वाद आणि चिकित्सा 

यांच्या संदर्भातील अनेक गूढ प्रश्नांचा तळ गाठणे शक्य होईल.

 

Write a review

Please login or register to review

Tags: Sarjanshodhachya Paulkhuna | सर्जनशोधाच्या पाऊलखुणा