Samvad: Sadeha 'Fantasy'shi | संवाद : सदेह ‘फॅन्टसी’शी
- Author: Sanjay Arvikar | संजय आर्वीकर
- Product Code: Samvad: Sadeha 'Fantasy'shi | संवाद : सदेह ‘फॅन्टसी’शी
- Availability: In Stock
-
₹300/-
- Ex Tax: ₹300/-
स. न. वि.
वि.
पद्मगंधाच्या दिवाळी अंकातील तुमची प्रदीर्घ मुलाखत वाचली. फार आवडली. तिच्यावरून तुमचा व आर्वीकरांचा बौद्धिक व मानसिक आवाका किती मोठा आहे, हे सहज लक्षात येते. प्रस्तुत अंक मला प्रा. म. वा. धोंड यांनी मुद्दाम वाचायला दिला.
बाकी ठीक.
आ
रा. भा.
पाटणकर
24 डिसें. 2003
श्री. अरुण
जाखडे यांस सप्रेम नमस्कार.
दिवाळी अंकातील कमल देसाईंची मुलाखत अतिशय आवडली. मी आजवर अशी दुसरी कोणतीच मुलाखत वाचलेली आठवत नाही.
डॉ. रा. भा. पाटणकर यांना ती वाचायला दिली, तेव्हा त्यांनाही ती खूप खूप आवडली. ही वाढवून पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावी, असे
तीव्रतेने वाटते. त्याकरिता पुढील सुधारणा सुचवितो.
1. या
आनंदयात्रेच्या अखेरच्या दिवशी जो जिव्हाळा दाटून येतो,
त्याचा
प्रत्यय आधीपासूनच काही प्रमाणात तरी यावा.
2. कमल, संजय, स्थळ, काळ इत्यादी सर्वच समूर्त व्हावीत.
त्याकरिता
छायाचित्रे व रेखाचित्रे अधिक यावीत.
3. कमल
देसाईंची जीवनयात्रा आणि त्यांच्या सर्वच कथांचा परिचय व
प्रत्येकाचे
वैशिष्ट्य, अशी दोन
परिशिष्टे जोडावीत.
कळावे, लोभ वाढावा हीच विनंती.
आपला,
म. वा. धोंड
Tags: Samvad: Sadeha 'Fantasy'shi | संवाद : सदेह ‘फॅन्टसी’शी

