Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Bahurupi Ramkatha | बहुरूपी रामकथा
आदिकवी वाल्मिकींच्या महाकाव्याला दृष्टीसमोर ठेवून आपण रामायण हा शब्द एकवचनी वापरत असलो, तरी प्रत्यक्षात तो बहुवचनीच वापरला पाहिजे. अभिजात वाङ्मयपरंपरेत आणि लोकपरंपरेतही. विविध कालखंडांत शतकानुशतके रामकथा पुन्हा पुन्हा सांगितली, गायली, लिहिली गेली आहे. भारताच्या विविध प्रांतांमध्ये, बृहत्तर भारतामध्ये आणि आशिया खंडातल्या अनेक लहान-मोठ्या देशांमध्येही रामकथेची अनेक रूपे चित्रांतून, शिल्पांतून आणि वाङ्मयातून प्रकट झाली आहेत.
त्या बहुरूपी रामकथेचा विविधांगी परिचय एकत्रितपणे मराठीतून प्रथमच इथे घडवला आहे.