Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Disha Aani Vata : Kahi Pravasanondi|दिशा आणि वाटा: काही प्रवासनोंदी
  • Disha Aani Vata:Kahi Pravasanondi|दिशा आणि वाटा: काही प्रवासनोंदी

Disha Aani Vata:Kahi Pravasanondi|दिशा आणि वाटा: काही प्रवासनोंदी

  • ₹350/-

  • Ex Tax: ₹350/-

 डॉ. आशुतोष जावडेकर हा जगण्यावर, गाण्यावर, शब्दांवर आणि प्रवासावर प्रेम करणारा गोष्टीवेल्हाळ माणूस आहे. विविध क्षेत्रात वावरताना सैलमोकळा वाटणाऱा हा माणूस दिशा आणि वाटांबाबत पक्का आहे. आपल्याला कुठं व का जायचं आहे याची पक्की जाण त्यांना आहे. त्यांनी आपल्या देशा-परदेशातील प्रवासाच्या कथनांना `प्रवासनोंदी` म्हटलं आहे खरं, पण त्या केवळ नोंदी न उरता त्यापलीकडची संस्मरणं झाली आहेत. पॅरिस ते बाली व्हाया मदुराई फिरताना त्या त्या ठिकाणांना लगटून काही आठवणी येतात, तर कधी तेथील कहाण्यांमधून, माणसांमधून, निसर्गदृश्यांमधून या लेखकाचं रमणंही दिसतं. आपल्या नेहमीच्या चाकोरीतून बाहेर पडून वेगवेगळ्या मार्गांनी जीवन अनुभवण्याचा मार्ग या प्रवासवर्णनांतून दिसतो. त्याचबरोबर कित्येकदा हा प्रवास केवळ बाह्य स्वरूपाचा नाही, तर तो आतलाही प्रवास आहे हेही जाणवत राहतं. डॉ. जावडेकर केवळ ठिकाणांचं, त्यांच्या काळाचंच वर्णन करून थांबत नाहीत, तर इतिहास आणि संस्कृतीच्या मुद्द्यांनाही ते स्पर्श करतात. अशावेळी त्यांच्या गद्यातील साधेपणा परकीय संदर्भही बोजड होऊ देत नाही. ते प्रवासाचा अनुभव खूप ताज्या मनानं घेतात आणि साहजिकच त्या उल्हसित मनानं त्यांनी केलेले हे वर्णन रोमॅंटिक होते. त्यात सहजता आहे. ते तुम्हाला बोट धरून त्या त्या ठिकाणी घेऊन जातात. वाचकांच्या सांस्कृतिक दृष्टिकोनाचा विस्तार करणारं हे लेखन आहे.

Write a review

Please login or register to review

Tags: Disha Aani Vata : Kahi Pravasanondi|दिशा आणि वाटा: काही प्रवासनोंदी