• Radio Kosi | रेडियो कोसी

Radio Kosi | रेडियो कोसी

  • ₹280/-

  • Ex Tax: ₹280/-

रेडियो कोसी’ ही कादंबरी, विकासाच्या रूढ कल्पनांवर प्रश्नचिन्ह उभे 

करते. जग ज्यांना विसरून गेले आहे, अन् कोसीच्या खोर्‍यात कित्येक 

दशकांपासून ज्यांच्या आयुष्याची परवड होत आहे अशा लोकांची ही 

कर्मकहाणी आहे. पुष्यमित्र यांनी ओघवत्या भाषेत अनेक हृदयस्पर्शी प्रसंग 

निर्माण केले आहेत आणि जगण्याचे मर्म उलगडून दाखवले आहे. लोकांच्या 

सुख-दु:खाशी देणेघेणे नसलेले सत्ताधारी आणि प्रशासक यांच्या हृदयशून्य 

कारभाराचे उत्तम चित्रण त्यांनी ‘रेडियो कोसी’ या कादंबरीत केले आहे. 

- हृषीकेश सुलभ (कथालेखक, नाटककार) 

भ्रष्ट कॉर्पोरेट मिडीयाने व्यापून टाकलेल्या वातावरणात, प्रामाणिक लोकांनी 

सामान्य लोकांसाठी चालवलेल्या आदर्शवादी वृत्तवाहिनीचा शोध या 

कादंबरीत घेतला आहे. आजच्या काळात ह्या आणि अशा लेखनाची खूप 

आवश्यकता आहे.
- अविनाश दास (कवी, चित्रपट दिग्दर्शक)
मी गेली चाळीस वर्षे ज्या एका अस्पर्शित कथाविषयाच्या शोधात होते

तिथेच ‘रेडियो कोसी’ उगवली आहे. लेखन शैलीत नेहमीच नावीन्याचा शोध 

घेणार्‍या पुष्यमित्र यांनी ही कथा अतिशय कौशल्याने विणली आहे. कादंबरी 

वाचनीय तर आहेच, शिवाय एक महत्त्वाचा विचार वाचकाच्या मनात 

उतरविण्याची ताकद लेखनात आहे. रसाळ भाषा व कोसीच्या प्रवाहासारखा 

घटनाक्रम वाचकाला गुंतवून ठेवतो. ‘रेडियो कोसी’ वाचल्यावर वाचकांना 

कोसीच्या तटबंदीला भेट देण्याची नक्कीच इच्छा होईल.
- उषाकिरण खान (कथालेखक)

 

Write a review

Please login or register to review

Tags: Radio Kosi | रेडियो कोसी