Kaayantar | कायांतर
- Author: Rashmi Padwad - Madankar | रश्मी पदवाड-मदनकर
- Product Code: Kaayantar | कायांतर
- Availability: In Stock
-
₹600/-
- Ex Tax: ₹600/-
‘कायांतर’ वाचताना लक्षात येते की, ही
केवळ कादंबरी नाही, तर ही एका तृतीयपंथी
महिलेची जीवनकथा आहे. या पुस्तकाचा आकृतीबंध
कादंबरीचा असेलही, पण ही
केवळ कुणा एकाची रंजक गोष्ट नाही. तर आपल्या
समाजाच्या विचारसरणीचे विविध
स्तर उलगडणारी कथा आहे.
निसर्गाचे दान न पडलेल्या कुणाचीही कशी ससेहोलपट होते, घुसमट
होते याचे विदारक
दर्शन ही कादंबरी घडवते. नागपूरच्या आंचल वर्मा
हिच्या आयुष्यात खूप वेदना आहेत,
पण तिची जिद्द त्याहूनही मोठी आहे. तिच्या प्रत्येक
पावलामागे आत्मसन्मानासाठीची
झुंज आहे आणि प्रत्येक स्वप्नामागे जगण्याची तिची न
थकणारी इच्छा.
या कथेत दु:ख आहे, पण निराशा नाही.
संघर्ष आहे, पण हार नाही. इथे आहे ती
माणसाच्या आत दडलेली अमर्याद ताकद आणि स्वतःला
ओळखण्याचे धैर्य.
म्हणूनच ‘कायांतर’ वाचताना तृतीयपंथीयांच्या
आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन
बदलतो. त्यांचे अस्तित्व, त्यांची
स्वप्ने आणि त्यांचे माणूसपण जवळून जाणवते.
Tags: Kaayantar | कायांतर

