Sahitya, Samaaj, Bhasha Aani Abhiruchi | साहित्य, समाज, भाषा आणि अभिरुची
- Author: G. M. Pawar | गो. मा. पवार
- Product Code: Sahitya, Samaaj, Bhasha Aani Abhiruchi | साहित्य, समाज, भाषा...
- Availability: In Stock
-
₹650/-
- Ex Tax: ₹650/-
प्रा. गो. मा. पवार हे मराठी साहित्याचे साक्षेपी समीक्षक व
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचे व्यासंगी अभ्यासक म्हणून
मराठी वाचकांना सुपरिचित आहेत. साहित्याचा सामाजिक दृष्टीने
विचार करणार्या अग्रगण्य समीक्षकांमध्ये प्रा. पवार यांची गणना होते.
त्यांनी लिहिलेली सैद्धान्तिक व उपयोजित समीक्षा मराठीत महत्त्वाची
मानली जाते. पवार यांनी मराठीत विनोदात्म लेखनाचा सैद्धान्तिक आराखडा,
तसेच मराठीतील विनोदी वाङ्मयासंबंधी मौलिक असा विचार मांडला आहे.
प्रा. पवार यांच्या या ग्रंथात साहित्य, समाज, भाषा आणि अभिरुची विषयांवरील
लेखांचा समावेश आहे. कथा, कादंबरी, नाटक व
कविता या प्रकारांतील
लेखांबरोबर वैचारिक साहित्य व अन्य वाङ्मयविषयक लेखांचा समावेश आहे.
या ग्रंथातील लेखनाचे स्वरूप हे वैचारिक लेख ते परामर्शात्मक लेख असे आहे.
अभिरुचीविचार हा पवार यांचा महत्त्वाचा समीक्षाविचार आहे.
या दृष्टीने अर्धशतकातील मराठी अभिरुची आणि साहित्यमूल्य यांच्या
परस्परसंबंधांचा घेतलेला आंतरछेद हे त्यांच्या या ग्रंथाचे महत्त्वाचे
वैशिष्ट्य आहे.
रंजक साहित्य आणि गंभीर साहित्य यातील टकरावाच्या विपुल नोंदी
पवार यांच्या लेखनात आहेत. त्या दृष्टीने त्यांनी आधुनिक लेखक व
त्यांच्या साहित्यकृतींचा मांडलेला विचार महत्त्वाचा आहे.
पवार यांच्या समीक्षेत प्रस्थापित लेखकाची परखड आणि चिकित्सक
अशी समीक्षा आहे. साहित्यपरंपरा व साहित्यमूल्यांची सूक्ष्म जाण,
भेदक अशी मीमांसा, मर्मग्राही
आस्वाद आणि तर्कशुद्ध सहज प्रतिपादन,
बहुविध प्रकारचा व्यासंग तसेच साहित्य आणि समाज यातील अनुबंधांचा
मर्मज्ञ विचार पवार यांच्या समीक्षेत आहे.
प्रा. गो. मा. पवार यांच्या आयुष्यभराच्या चिंतनविश्वाचा आविष्कार असणारा
हा मराठीतील महत्त्वाचा समीक्षाग्रंथ आहे.
Tags: Sahitya, Samaaj, Bhasha Aani Abhiruchi | साहित्य, समाज, भाषा आणि अभिरुची

