Samvadatun Sahityashodh | संवादातून साहित्यशोध
- Author: Editing by Balkrushan Kavathekar, Lata Moharir
- Product Code: Samvadatun Sahityashodh | संवादातून साहित्यशोध
- Availability: In Stock
-
₹400/-
- Ex Tax: ₹400/-
‘ज्येष्ठ
समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या समीक्षालेखनाचा
सैद्धांतिक सातत्य हा महत्त्वाचा विशेष आहे. गेल्या पासष्ट वर्षांत
मराठी साहित्याच्या स्वरूपात आणि साहित्यविचारातही
अनेक चढउतार व स्थित्यंतरे होऊनही रसाळांची भूमिका मात्र
अविचल राहिली. ती प्रगल्भ झाली, पण तिने तिचे
सैद्धांतिक अधिष्ठान मात्र बदलले नाही. आपल्या सैद्धांतिक भूमिकेला
त्यांनी
काही विचारांची जोड दिलेली असली, तरी ती
त्यांच्या
मूळ भूमिकेपासून दूर नेणारी मात्र ठरलेली नाही.
रसाळ यांची साहित्यविषयक भूमिका साधारणपणे कलावादी
म्हणता येईल अशी असली, तरी तिचे वेगळेपण असे की,
सामाजिकता आणि कलावाद त्यांना परस्परविरोधी वाटत नाहीत.
समीक्षक
सुधीर रसाळ यांची साहित्यविषयक भूमिका
नेमकेपणाने समजून घेण्यासाठी या सहा मुलाखती उपयुक्त ठरतील.
एखाद्या समीक्षकाचा समग्र साहित्यविचार मुलाखतींमधून प्रकट होणे,
वाचकांना तो एकत्रितपणे वाचावयास मिळणे हे
मराठीत प्रथमच घडत आहे.’

