Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Prathibha Aani Sarjanshilta |प्रतिभा आणि सर्जनशीलता
  • Prathibha Aani Sarjanshilta |प्रतिभा आणि सर्जनशीलता

Prathibha Aani Sarjanshilta |प्रतिभा आणि सर्जनशीलता

  • ₹450/-

  • Ex Tax: ₹450/-

प्रतिभा आणि सर्जनशीलता ह्यांचे परस्परसंबंध अतिशय 

अभिन्न आहेत. साहित्य आणि साहित्येतर कला ह्यातच नव्हे 

तर विज्ञान, तंत्रविज्ञान, कला, वाणिज्य, व्यवस्थापन 

अशा मूलभूत आणि उपयोजित शाखांत प्रतिभेला आणि सर्जनशीलतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

प्रतिभेच्या स्पर्शाने होणारी नवनिर्मिती अधिक उन्नयित होते. 

प्रतिभा ही उपजत असते का, ती सुदैवी व्यक्तींनाच प्राप्त होते का किंवा ती कष्टसाध्य आहे का, असे प्रश्‍न अनेकांना पडतात. 

ह्या व अशा अनेक प्रश्‍नांचा शोध घेणारा हा ग्रंथ 

अतिशय महत्त्वाचा आहे.

प्रतिभा म्हणजे काय, प्रतिभेची वैशिष्ट्ये, प्रतिभेचे स्पष्टीकरण, प्रतिभेचे स्वरूप आणि प्रतिभेची विविध रूपे 

ह्यांची चर्चा भारतीय व पाश्‍चिमात्य तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, 

मेंदूविज्ञान, जैविक उत्क्रांती अशा विविध ज्ञानशाखांना 

स्पर्श करत विविध अंगांनी केली आहे.

ह्याबरोबरच सर्जनशीलता म्हणजे काय, सर्जनशीलतेचे सिद्धांत आणि सर्जनशीलतेची प्रक्रिया ह्यासंंबंधीचा लेखकाचा अभ्यास व निरीक्षणे आपल्या मनातील कुतूहल पूर्ण करतात.  

मराठीमध्ये अलक्षित राहिलेला परंतु अतिशय महत्त्वाचा हा विषय डॉ. सुधाकर देशमुख यांच्या अभ्यास व संशोधनवृत्तीतून साकार झाला आहे. मराठीतील ह्या विषयावरचे बहुधा हे पहिलेच पुस्तक डॉ. देशमुखांच्या संशोधनवृत्तीचेही प्रातिभदर्शन देणारे आहे.

Write a review

Please login or register to review