Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Manuspanachi Sanad| माणूसपणाची सनद
  • Manuspanachi Sanad| माणूसपणाची सनद

Manuspanachi Sanad| माणूसपणाची सनद

  • ₹450/-

  • Ex Tax: ₹450/-

माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला यावर त्याच्या जगण्याचे मोल ठरत असते. माणसाच्या जन्माबरोबर त्याच्या वाट्याला आलेले रंग आणि रूप हे निसर्गदत्त घटक बदलता येत नाहीत मात्र प्रयत्नपूर्वक जीवनाची गुणवत्ता सुधारता येते. त्यासाठी जीवनदृष्टी आवश्यक असते. ती चांगल्या विचारांच्या पेरणीतून मिळते. अशाच विचारांची दिवेलागण प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांनी त्यांच्या 'माणूसपणाची सनद' या पुस्तकात केली आहे.

जगण्याच्या परिघात येणाऱ्या अनेक विषयांवरचे मौलिक चिंतन या पुस्तकातील लेखांमध्ये आहे. जगात मोठी आई आणि भुई या लेखापासून सुरू झालेला प्रवास जगण्याच्या महाभारताला कवेत घेत माणूस धर्माला जागविणाऱ्या मूल्यांपर्यत येऊन पोहोचतो. माती, नाती आणि संस्कृती यांचा उद्घोष करणाऱ्या या लेखनात माणूसपणाचा परिमळ दरवळतो आहे. काळजाला भिडणारे शब्द आणि अंतर्मुख करणारे विचार यामुळे हे पुस्तक वाचकांच्या जाणिवा समृद्ध करेल अशी मला खात्री आहे. समाजवास्तवावर परखडपणे बोट ठेवताना माणसांचा जीवनोल्हास थोडाही कमी होणार नाही याची दक्षता लेखक म्हणून कानडे यांनी घेतली आहे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.

बाहेरच्या प्रचंड कोलाहलात 'आतल्या आवाजाचे विस्मरण' झालेल्या समाजात तो ऐकण्याची उत्कंठा निर्माण झाली तर ते या पुस्तकाचे खरे यश असेल.

प्रा. मिलिंद जोशी
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

Write a review

Please login or register to review

Tags: Manuspanachi Sanad| माणूसपणाची सनद