Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Mahatma Phule Yancha Shikshanvichar| महात्मा फुले यांचा शिक्षणविचार

Mahatma Phule Yancha Shikshanvichar| महात्मा फुले यांचा शिक्षणविचार

  • ₹150/-

  • Ex Tax: ₹150/-


ज्ञानाची उपासना, व्यक्तीचे स्वातंत्र्य, सर्व प्रकारच्या जाचक बंधनापासून माणसाची मुक्तता आणि सत्य, समता, न्याय यांच्या पायावर समाजाची पुनर्रचना; हा महात्मा फुले (इ. स. १८२७-१८९०) यांचा विचार हिंदुसमाजाची सबंध संरचना बदलून टाकणारा होता. वर्णाश्रमधर्माने मुसक्या बांधलेल्या शूद्रातिशूद्रांच्या कैवाराने फुल्यांनी पुरोहितशाही विरुद्ध युद्ध पुकारले. ज्ञान हेच त्यांचे शस्त्र होते. बहुजनांना ज्ञानाची सनद देणारा त्यांचा शिक्षणविचार क्रांतिकारी वळणाचा होता. समाजाच्या तळातील आदिवासी, दलित, खेडूत, श्रमिक आणि स्त्रिया यांना केंद्र करणारे नवे वाङ्‌मयीन प्रवाह फुले विचारातूनच उसळून-उफाळून आले आहेत. कोट्यवधींना निरक्षर ठेवून मूठभर धनदांडग्यांच्या पदरात भरभरून माप घालणार्‍या आजच्या शिक्षणव्यवस्थेत परिवर्तन घडवायचे तर आजही फुल्यांच्या शिक्षणविचाराचे चिंतन-मनन आणि अवलंबन केले पाहिजे याचे भान देणारा हा ग्रंथ आहे. शिक्षण आणि समाज यांच्याविषयीच्या आस्थेने डॉ. द. के. गंधारे यांनी आजच्या तरुणांसमोर महात्मा फुले यांचे जीवन, लेखन आणि कार्य यांच्या पार्.पटावर त्यांच्या शिक्षणविचाराची मांडणी, तपासणी आणि प्रस्तुतता नेमकेपणाने ठेवली आहे. डॉ. र. बा. मंचरकर

 

Write a review

Please login or register to review