Kanupriya | कनुप्रिया

  • ₹80/-

  • Ex Tax: ₹80/-

ही कहाणी आहे कनुच्या म्हणजे कन्हैयाच्या प्रियेची - राधेची आणि अर्थातच तिच्या कनुचीही! तिच्याच शब्दांत. भारतीय जनमानसावर शतकानुशतके अधिराज्य करणार्‍या ह्या सर्वाधिक लोकप्रिय प्रेमीयुगुलाच्या बहुपेडी नात्याचा त्यातील एकाने घेतलेला हा धांडोळा! कनुप्रियामधील राधा जनसामान्यांच्या मनातील प्रतिमेहून वेगळी आहे, खूप वेगळी. कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडूनही आपलं अस्तित्व त्याच्यात विलीन न करणारी, इतिहासात आपलं नाव न माळल्याबद्दल त्याला जाब विचारणारी आणि तरीही जन्मजन्मांतरीच्या पायवाटेवरील सर्वांत अवघड वळणावर त्याची वाट पाहणारी... तुझ्या महान होण्यानं माझं काहीतरी उद्ध्वस्त झालं आहे का कनु?’ असा आर्त प्रश्न विचारणारी राधा महायुद्धात असहाय असणार्‍या व्यक्तीचं, ह्या काव्याला सार्वकालिक करणारं प्रतीक आहे.

Write a review

Please login or register to review