सवलत योजना

  • Product Code: सवलत योजना
  • Availability: In Stock
  • ₹770/-

  • Ex Tax: ₹770/-

३ ऑक्टोबर  २०२० - ११ ऑक्टोबर २०२० पुस्तकांवर ३०% सूट !!


दगडी मक्ता - रमेश अंधारे

जाते-पाटे व दगडी मूर्ती घडवून जत्रांमध्ये विकणार्‍या पाथरवट कुटुंबातील उमा हा या कादंबरीचा नायक. व्यवस्थेच्या विरोधात तो संघर्ष करतो आणि पुढे त्याला अनेक वेळा अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं. 

उमानं काढलेली दगड कामगार व मूर्तिकला सहकारी संस्था, शेतमालाच्या भावासाठी केलेली आंदोलनं, स्टोन क्रशर, डेअरी, रस्तेबांधणी यामुळे ठेकेदार, जातपंचायत वराजकारणी यांच्याकडून निर्माण झालेल्या व्यक्त-अव्यक्त विरोधाला उमा तोंड देतो. 

कथानायक उमा, त्याची पत्नी अंजली, प्रा. निखाडे,  अशोक कांबळे या मुख्य व्यक्तिरेखांबरोबरच भास्करराव, वाल्मिकराव हे नेते, कोंडू-रुक्मी यांचे व्यक्तिचित्ररेखाटन चित्रदर्शी झालेले आहे. नव्यानेच घडविलेल्या म्हणी व उक्ती, वर्‍हाडी आणि पाथरवटी बोलींचं मिश्रण आणि भाषेचा केलेला सर्जक वापर यांमुळे कथेची वाङ्मयीन यत्ता वाढली आहे. 

प्रतिनायकप्रधान कादंबर्‍यांनंतर रमेश अंधारे यांची ही नायकप्रधान कादंबरी महत्त्वाची ठरेल. या कादंबरीतील पाथरवट समाजाचे सूक्ष्म तपशिलांसह आलेले चित्रणही    लक्षणीय आहे. जातींमधलं वैमनस्य, जातपंचायतीची सत्ता यांसह समकालीन समाजवास्तवाचं भेदक चित्रण ही या कादंबरीची जमेची बाजू आहे.


कागूद आणि सावली -  आनंद पाटील

खरेदीखत हा ‘कागूद’ या लघुकादंबरीचा साधा विषय. परंतु ‘कमवा व शिका’ योजनेत पदवीपूर्व वर्गात शिक्षण घेणारा अल्पभूधारकाचा मुलगा या चक्रव्यूहात ओढला जातो. घरात शेतीच्या तुकड्यावर जिवापाड प्रेम करणारी माणसं. हा ‘कागूद’च आपल्या शिक्षणाच्या आड येण्याचं भय नायकाला छळते. गावठी तिढ्यातून सुटका करीत तो पुढे जातो. त्याचा हा रसरशीत अनुभव बरेच धडे शिकवतो. ग्रामीण वास्तवाची धगच त्याला घडवत असते. ‘कागूद’ मातीचे गुण घेऊन उतरली आहे. 

खेड्यात घर बांधण्याचा गिरणी कामगाराचा विदारक अनुभव किती विविध अंगांनी फुलू शकतो, हे ‘सावली’ने दाखवून दिले आहे. गतशतकाच्या अखेरीचा कापडगिरणी कामगारांचा संप ही तिची पार्श्वभूमी आहे. एकत्र कुटुंब, भाऊबंदकी, दारिद्य्र, शोषण असे अनेक धागे या ‘सावली’च्या पोतात कौशल्याने गुंफलेले दिसतील. कोरीव लेण्यासारखी तिची रचना आणि बंदुकीच्या गोळ्या सुटाव्या असे प्रभावी संवाद वाचक विसरूच शकत नाही. या दोन अस्सल ग्रामीणलघुकादंबर्‍यांना मैलाच्या दगडाचा मान मिळाला आहे. त्या नेहमीच वाचकांना भारावून सोडतात.


अधोलोक- वसंत आबाजी ढहाके

ही एक धीरगंभीर, शोकांत कादंबरी आहे..भय..अपराध..लाचारी..असंबधता..व्यक्तित्वहीनता..या साऱ्यांना वेढून असलेली एक अद्रुष्य विराट सत्ता...या सत्तेच्या विळख्यात अडकून सापडलेल्या नी पाराभूत झालेल्या एका व्यक्तिची ही कथा..विविध पातळ्यांवर फिरणारा हा अनुभव मानवी जीवनातील मूलभूत समस्यांचा वेध घेऊ पाहतो..

   

संचाची किंमत : ७७० रुपये

सवलत मूल्य : ५४० रुपये + (टपाल खर्च)

पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक : http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=672


अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-२५४४२४५५ / ७३५०८३९१७६
 

Write a review

Please login or register to review