Rashtrakut Rajvat Aani Jain Dharma | राष्ट्रकूट राजवट आणि जैन धर्म

  • ₹425/-

  • Ex Tax: ₹425/-

प्रा. नागराजय्या हम्पा हे कर्नाटकातील विद्वान अभ्यासक, संशोधक आहेत. कर्नाटकच्या इतिहासात दोनशे वर्षांची राष्ट्रकूटांची राजवट प्रसिद्ध व यशस्वी आहे. या इतिहासाचा अभ्यास करताना, प्रा. हम्पा यांनी राष्ट्रकूटांच्या कारकिर्दीत सर्व क्षेत्रांत जैन धर्मीयांचे योगदान कसे झाले व त्याचा काय परिणाम झाला याचा शोध घेतला आहे. प्रा. हम्पा यांनी यासाठी क्षेत्रीय अभ्यास केला. पुरालेख, शिलालेख, स्तंभलेख, ऐतिहासिक नोंदी यांचा सूक्ष्म अभ्यास केला. जैन मठ, मंदिरे, अभ्यास केंद्रे यांना त्या काळात मिळालेला राजाश्रय व त्यामुळे साहित्य, अध्यात्म, शिल्पकला, स्थापत्यशास्त्र, काव्य, लोकभाषा यांचा कसा विकास होत गेला, हे अधोरेखित केले आहे. महाराष्ट्रातील विद्वान वाचक, अभ्यासक, संशोधक या पुस्तकाचे नक्की स्वागत करतील.

 

Write a review

Please login or register to review

Tags: Rashtrakut Rajvat Aani Jain Dharma | राष्ट्रकूट राजवट आणि जैन धर्म