Sahityavedh | साहित्यवेध

  • ₹400/-

  • Ex Tax: ₹400/-

साहित्यसमीक्षा एकाच वेळी साहित्याची आणि जीवनाची समीक्षा करीतच प्रगत होत असते, हे मान्य केले, तर मराठी समीक्षेला जगातील विविध समीक्षादृष्टींची ओळख होणे आवश्यक आहे.

के. रं. शिरवाडकरांचे साहित्यवेधया दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.

श्री. शिरवाडकर साहित्यवेधमधून अनेक समीक्षापद्धतींचे

मराठी साहित्यातील संदर्भ देत विवेचन तर करतातच;

पण त्यांचे साधकबाधक मूल्यमापनही करतात आणि

शेवटी स्वत:ची साहित्यविषयक कल्पना विशद करतात.

साहित्यसमीक्षेतील रूपवादी दृष्टिकोन त्यांना त्याज्य वाटतो.

कारण साहित्य, संस्कृती आणि जीवन ह्यांचे अतूट संबंध आहेत आणि ह्या तीनही गोष्टी परस्परांच्या संदर्भातच कळू शकतात,

असा त्यांचा दृढ विश्वास आहे. हे प्रस्तुत ग्रंथाचे केंद्रवर्ती विधानही मानता येईल.

समारोपह्या महत्त्वपूर्ण प्रकरणात स्वत:चे साहित्यविषयक विचार मांडताना त्यांनी साहित्याच्या अनिवार्य संदर्भांसह स्वतंत्र आणि पृथगात्म विवेचन केले आहे. साहित्यवेधमधील चर्चेतून अनेक विचारांना चालना मिळेल आणि साहित्यसमीक्षेच्या अभ्यासकाला नवीन दिशा सापडतील, असा विश्वास वाटतो.

Write a review

Please login or register to review

Tags: Sahityavedh | साहित्यवेध