• Vichakshana | विचक्षणा

Vichakshana | विचक्षणा

  • ₹260/-

  • Ex Tax: ₹260/-


डॉ. श्रीधर  व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू  आहे ; मानदंडही  आहे. 
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या  तेहतीस खंडांनी  ज्ञानसागराचे  मंथन  करून  महाराष्ट्राच्या  करतालावर अमृताचा नैवेद्य  ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने  मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या  वेटोळे  घालून  बसलेल्या मराठी  कादंबरीला घनदाट अरण्याचे  रूप  दिले. 
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे  शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी  मोहित  केले 
-

' विचक्षणा '(१९३७)
ही  कादंबरीकाराच्या निधनानंतर ग्रंथरूपाने  प्रकाशित झालेली  कादंबरी. समाजाच्या  सरहद्दींचा  शोध  आणि बोध निधड्या  छातीने  घेणे  हा  डॉ. केतकरांचा जीवनध्यासच होता, त्याला व्यासंगाचे  आणि स्वानुभवाचे अस्तर होते. 
डॉ. लोंढे, त्यांच्या कन्या विचक्षणा - मधुमालती, डॉ. तर्कटे, संकर्षण आठवले इत्यादी पात्रांच्या मुखांतून विवाह, विवाहबाह्य संबंध, अनौरस  संतती , संन्यास आणि संन्यासी इत्यादी विषयांच्या चाकोरीबाहेरील चर्चेने  ही  कादंबरी रंगलेली आहे. 
- डॉ. द. भि. कुलकर्णी    

Write a review

Please login or register to review

Tags: Vichakshana | विचक्षणा