Loksahitya : Shodh Aani Samiksha | लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा

  • ₹230/-

  • Ex Tax: ₹230/-

लोकसाहित्याभ्यासाच्या स्वरूपाची आणि सिद्धांतांची ही परिभाषाबद्ध चर्चा नव्हे तर शास्त्रीयतेची जाण सदैव जागी राखून आपल्या एकूण सांस्कृतिक परंपरेचा पट लोकतत्त्वीय अध्ययनदृष्टीतून स्पष्ट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या सांस्कृतिक इतिहासातील काही अस्पष्ट दुवे या ग्रंथातून स्पष्ट होतात, निसटलेले बंध जुळतात आणि कूटस्थळे उलगडू लागतात.

केवळ अभिजनांच्या परंपरेतील साधनांवर विसंबून त राहता बहुजन परंपरेतील साधनांचा सर्वस्पर्शी शोध घेण्याच्या धडपडीतूनच आपली सांस्कृतिक परंपरा समग्रतेने उलगडण्याचे आव्हान पेलले जाते असा साक्षात्कार घडवणारा हा ग्रंथ आहे. अध्ययनदृष्टी समन्वित असली की सर्व सामाजिक शास्त्रांच्या औपचारिक सीमांवरील कुंपणे लीलया कशी उखडली जातात आणि एका महाबोधाचे द्वार आपल्यापुढे कसे खुले होते याचा हा उत्तम सर्जनानुभव आहे. लोकसाहित्याभ्यासाची स्वत:ची स्वतंत्र अशी वेगळी वाट निवडणार्‍या आणि त्या वाटेवर निष्ठेने चालत असताना ज्ञानाची नवनवीन दर्शने घडविणार्‍या एका व्रती अभ्यासकाने घेतलेल्या मर्मग्राही विषयशोध म्हणजे हा प्रस्तुत ग्रंथ!

Write a review

Please login or register to review