Jehad |जेहाद

  • ₹150/-

  • Ex Tax: ₹150/-

माणूस महत्त्वाचा, की धर्म महत्त्वाचा? धर्मामध्ये शिकवली गेलेली माणुसकी मोठी, की आंधळेपणाने स्वार्थासाठी धर्माचा वापर करून घेणारे लोक मोठे? उपकार करणारे निरपेक्षपणे उपकार करतात, की धर्मांतरासाठी मन तयार करण्यासाठी ते उपकार असतात? दोन धर्मांत वाढलेल्या, पण 'प्रेम' या एकमेव धर्माच्या हाकेला ओ देताना झालेली दोन जिवांची घालमेल या कादंबरीत श्री. बोळुवारु महमद कुंञि यांनी अतिशय मार्मिक-हळुवारपणे टिपली आहे. जीवनातील धर्मयुद्ध खेळताना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता चक्रव्यूहात सापडलेल्या युवकाच्या पराभूत जीवनाची ही कथा. अतिशय सुन्न करणारी. परंपरावाद्यांना विचार करायला लावणारी, संयमशील शैलीत मानवी संबंधांची गुंतागुंत मांडण्याचा प्रयत्न करणारी मूळ कन्नड भाषेतील ही कादंबरी डॉ. अ. रा. यार्दी यांच्या समर्थ लेखनातून तितक्याच प्रभावीपणे मराठीत उतरली आहे.

Write a review

Please login or register to review