Smrutitarang |स्मृतितरंग

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-

त्र्यंबक वसेकर हे मराठवाड्याच्या चित्रकला क्षेत्रातील एक आदरणीय नाव. 1955 साली त्यांनी नांदेड येथे

अभिनव चित्रशाळा ही मराठवाड्यातील पहिली कलाशिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या

उच्च शिक्षणाची संधी मिळवून दिली आणि महाराष्ट्रभर बालचित्रकलेचा प्रसार केला.

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण सल्लागार मंडळाचे आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य.

त्यांनी केलेली अनेक मान्यवरांची पोर्टेट्स मराठवाड्यातील विविध संस्थांमध्ये आहेत. कविता, कथा, लोकसाहित्याचे संकलन, चित्रकलाविषयक लेखसंग्रह अशी त्यांची

पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांचे कार्य गौरविले गेले आहे.

Write a review

Please login or register to review