Lampancha Bhavavishwa | लंपनचं भावविश्व

  • ₹120/-

  • Ex Tax: ₹120/-

'लंपन’ नावाचा सर्वांगसुंदर मानसपुत्र निर्माण करून संतांनी हे अनोखे जग निर्माण केले आहे. लंपन हा प्रकाश संत यांच्या प्रतिभेचा अद्भुत आविष्कार आहे. लंपनच्या अनेक गुणविशेषांनी ही कथासृष्टी आपल्याला मोहून टाकते.

बालपणातील अनेक परिचित गोष्टींकडे लंपन - पर्यायाने लेखक - नव्या

जाणिवांनी पाहतो. वस्तुत: या कथासृष्टीतील घटनाव्यक्तीनिसर्ग

आपल्याला नवे नसतात. नवी आहे ती लेखकाची लखलखीत जाणीव आणि अद्भुत संवेदनशीलता. या नव्या आणि अद्भुत संवेदनशीलतेवर आपण लुब्ध होतो. या संवेदनशीलतेने परिचित असणारे बाल्य आपल्याला नवे दिसायला लागते. या बाल्याला नित्यनूतनत्व प्राप्त होते. त्यातील सौंदर्यदर्शनाने आपण स्तिमित होतो.

 

Write a review

Please login or register to review