Ahirani Got |अहिराणी गोत

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-

अहिराणी भाषेतील हे पुस्तक अहिराणी भाषा आणि लोकजीवनाच्या गुणवैशिष्ट्यांसह आहे. अहिराणी भाषेचे सौंदर्य ह्यातील प्रत्येक लेखातून अनुभवता येते. हे पुस्तक चार भागांत विभागले आहे. पहिल्या भागात अहिराणी लोकपरंपरांविषयक सतरा लेख आहेत. दुसर्‍या भागात आदिवासी साहित्य, अहिराणी साहित्य व काही सामाजिक असे नऊ लेख आहेत. तिसर्‍या भागात आठ अहिराणी कथांचा समावेश आहे तर चौथ्या भागात बोधप्रद बालकथा आहेत. एकूणच अहिराणी भाषेचा संपूर्ण गोतावळा ह्या पुस्तकात भेटतो. अहिराणी भाषेचे अभ्यासक व मराठीतील प्रसिद्ध लेखक डॉ. सुधीर देवरे यांच्या ह्या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील अहिराणी ह्या लोकभाषेचा परिचय अधिक सखोल होत आहे. महाराष्ट्रातील ह्या महत्त्वाच्या उपभाषेतील लोकजीवन व लोकसंस्कृती समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

Write a review

Please login or register to review