Karveernivasini Shreemahalaxmi | करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी

  • ₹480/-

  • Ex Tax: ₹480/-

करवीर अथवा कोल्हापूर हे क्षेत्र आणि श्रीमहालक्ष्मी ही त्या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता यांना महराष्ट्राच्या देव्हाऱ्यात अग्रमानाचे स्थान आहे. अनेक मराठी घराण्यांची ही कुलदेवता आणि दक्षिणकाशीची प्रतिष्ठा पावलेले तिचे करवीर क्षेत्र यांचा स्वरूपशोध डॉ. ढेरे यांनी या ग्रंथात मर्मग्राही संशोधनदृष्टीने घेतला आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या पीठाच्याप्रभावाचा मागोवा घेताना सातवाहनकाळपर्यंत पोचण्याचा त्यांचा साधार प्रयत्न लक्षवेधी आहे .

महालक्ष्मी  नित्य - नैमितिक अश्या दीर्घ उपासनापरंपरेचा परिचय तर त्यांनी या ग्रंथात घडवला आहेच , पण तिच्या क्षेत्र माहात्म्यचा विविधांगी आणि व्यापक असा सांस्कृतिक अन्वयार्थही प्रथमच स्पष्ट केला आहे .

आदिम प्रवृत्तीच्या देवतांनी या देवतेविषयी दाखवलेल्या आत्मीयतेचा जाणता उलगडा त्यांनी केला आहे आणि या देवतेने केलेल्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रा बाहेरच्याही  नाना दैवतांच्या उपासनेच्या सात्विकीकरणाचा मार्मिक शोधही घेतला आहे .

कर्नाटकातील कोल्लूरची मुकांबिका आणि बदामीची बनशंकरी या दोन देवतांशी असलेल्या महालक्ष्मीच्या  अनुबंधांचा स्थलपुराणांच्या  आधारे त्यांनी घेतलेला शोध हा या ग्रंथाचा मौलिक विशेष म्हणावा लागेल . 

महाराष्ट्र-कर्नाटक राजघराण्यांनी महालक्ष्मीच्या उपासनेतून मिळवलेल्या असाधारण प्रतिष्ठेकडे त्यांनी संशोधनपूर्वक लक्ष वेधले आहेच, पण एकूणच या ग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे दक्षिण भारताशी असलेले आंतरसंबंध दृढ करणाऱ्या सांस्कृतिक सामरस्याकडे वाचकाला घेऊन जाण्याचे पूर्वस्वीकृत कार्यही त्यांनी या नव्या प्रातिभ संशोधनातून पुढे नेले आहे.

Write a review

Please login or register to review