American Nigro: Sahitya Aani Sanskruti |अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती

  • ₹280/-

  • Ex Tax: ₹280/-

 

आपल्या दलित साहित्याप्रमाणे नीग्रो साहित्य हा देखील एका पायदळी तुडवल्या गेलेल्या मानव समाजाने केलेला आक्रोश आहे. एके काळी तो वेदनेतून फुटणार्‍या किंकाळीसारखा असहाय्य होता. आता त्याला संतापाची धग लाभली आहे. पण हा आक्रोश करणारा समूह म्हणजे काही गुरांचा कळप नव्हे. त्यातला प्रत्येक माणूस हा एकाच क्षणी समदु:खी समाजाचा घटक आहे आणि जीवनातली सुखदु:खे, सौन्दर्य,

काम-क्रोध-लोभ यांचे स्वतंत्रपणाने भोग भोगणारा, त्यावरची आपली स्वत:ची म्हणून काही प्रतिक्रिया कलेच्या रूपाने व्यक्त करावी अशी तळमळ असणारा एकटा माणूसही आहे. त्याचे साहित्य, त्याचे मानस आणि ज्या मनुष्यसमूहात तो राहतो त्याचे समूहमानस या दोन्ही धाग्यांना मिळणार्‍या ताण्याबाण्यातूनच तयार होणार. ह्या

दृष्टीने रिचर्ड राइट, जेम्स बाल्डविन यांच्यासारख्या आज जागतिक वाङ्मयात स्थान मिळवणार्‍या नीग्रो लेखकांच्या रचनांतले साधर्म्य आणि विविधता प्रा. वाघमारे यांनी नीटपणाने उलगडून दाखवली आहे.

महाराष्ट्रात दलित साहित्याच्या रूपाने नवी सामाजिक जाण येत आहे.

अशा ह्या समाजचक्रपरिवर्तनाच्या काळात जनार्दन वाघमारे यांनी परिश्रमपूर्वक आणि सुबोध शैलीत लिहिलेला हा ग्रंथ दलितह्या संज्ञेचे व्यापक स्वरूप दाखवून गेला आहे. सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेतह्या भावनेने जगू इच्छिणारांनी हा ग्रंथ आणि नीग्रो साहित्य वाचायला हवे, हा नवा कृष्णावतार समजून घ्यायला हवा.

 

Write a review

Please login or register to review