Jugad|जुगाड

  • ₹120/-

  • Ex Tax: ₹120/-

जुगाड म्हणजे जुळणी

बांधकाम विश्वातला तो एक परवलीचा शब्द.

जुगाड सरकारी आनंदीआनंदाचं!

जुगाड माणसांचं! चमत्कारिक प्रवृत्तींचं!

परागंदा झालेल्या पावसाचं!

होरपळणार्‍या गावांचं; रोजगार हमीच्या साथीचं!

लाचारपणे मस्का मारणार्‍यांचं!

साहेबांच्या पुढं-पुढं करणार्‍यांचं!

नवे शब्द, नवी भाषा, नव्या परिमाणांचं!

बोगस मस्टचं! चोरीच्या सिमेंट-रेनफोर्समेंटचं! डांबराचं!

बाई बाटलीच्या सौद्याचं! सोईस्कर अफरातफरीच्या साटेलोट्याचं!

खिरापतींच्या कुरणात चरण्यासाठी सोकावलेल्या खादीधारी गिधाडांची अफलातून फिल्डिंग म्हणजे जुगाड. स्थापत्य विश्वाचा छोटेखानी आलेख किंवा मुक्तपणे फ्लॅश केलेल्या निवडक प्रकाशचित्रांचा कोलाज म्हणजे जुगाड.

Write a review

Please login or register to review