Yamuneche Pani | यमुनेचे पाणी

  • ₹400/-

  • Ex Tax: ₹400/-

डॉ. जनार्दन वाघमारे यांचे व्यक्तिमत्त्व बहुपदरी व अनुभवसंपन्न आहे. प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू व नगराध्यक्ष अशी विविध पदे भूषविताना त्यांना आलेले अनुभव ‘मूठभर माती’ ह्या त्यांच्या आत्मचरित्रात आले आहेत. 

डॉ. वाघमारे २००८ ते २०१४ या काळात राज्यसभा सदस्य होते. तिथे त्यांनी विविध समित्यांवर निष्ठेने काम केले. त्यांच्या कामातून त्यांच्या व्यासंगी आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांची त्यांनी सभागृहात चर्चा केली. एकूण सहा वर्षांच्या ह्या काळातील अनुभव व संसदीय लोकशाहीविषयीची त्यांची श्रद्धा ‘यमुनेचे पाणी’ ह्या आत्मचरित्रातून व्यक्त होते.

‘यमुनेचे पाणी’ हे पुस्तक मुख्यत्वे डॉ. वाघमारे यांच्या संसदीय कार्याविषयी असले तरी ते दिल्ली शहराचे अंतरंग उलगडून दाखवते. प्राचीन काळापासून ते ब्रिटिश राजवटीपर्यंत हे शहर कशा प्रकारे उत्क्रांत होत गेले, याचा धावता इतिहास त्यात आढळतो. यमुनेच्या काठावर अनेक राज्ये उदयास आली आणि विनाश पावली. दिल्ली ही भारताची राजधानी आहे तसेच ते एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय शहर आहे. राष्ट्रीय व जागतिक राजकारणाचे अंतःप्रवाह या शहरात वास्तव्य करणार्‍या प्रबुद्ध व्यक्तीच्या लक्षात येतात.

‘यमुनेचे पाणी’ हे पुस्तक भारतीय संसदीय लोकशाहीचे अंतरंग जाणून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही. राज्यशास्त्राचे अभ्यासक व संसदेत काम करण्याची ज्यांना संधी मिळेल, त्यांनाही मार्गदर्शक ठरेल.





Write a review

Please login or register to review

Tags: Yamuneche Pani | यमुनेचे पाणी