The Dark Holds No Terrors | द डार्क होल्ड्स नो टेर्रस

  • ₹180/-

  • Ex Tax: ₹180/-

तू अजून का जिवंत आहेस... तू का मेली नाहीस?' इतक्या वर्षांनंतरही आईचे हे शब्द सरिताला आठवतात. ती लहान असताना आपल्या बुडणार्‍या धाकट्या भावाला ती वाचवू शकली नव्हती. आता तिची आई हे जग सोडून गेली आहे आणि सरिता माहेरी परतली आहे, म्हटलं तर आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी, पण खरं तर रोज रात्री तिच्याशी जनावरासारखं वागणार्‍या नवर्‍यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी. आपल्या वडिलांच्या शांत सहवासात, आयुष्यात घडलेल्या घटनांचा ती विचार करते : छोट्या गावातील तिचं दुःखी बालपण, तिची कजाग आई, प्रभावशाली, तरुण, देखण्या कवी मनोहरशी झालेला तिचा विवाह (स्वतःच्या करिअरमध्ये अपयश आल्यानं आणि आपली बायको आपल्याला वरचढ ठरतेय हे दिसल्यामुळं तो तिच्याशी दुष्टाव्यानं वागतोय), तिची मुलं... आपल्या भावनांशी आणि उद्विग्रतेशी झगडता झगडता तिला जाणवतं की लग्रामुळं आलेल्या परावलंबित्वाशिवायही वेगळं आयुष्य आहे,आणि मग ती नव्यानंच गवसलेल्या सत्यांनी  आपलं जीवन सुखी करण्यासाठी उपयोग करण्याचा निर्धार करते. जगाशी संघर्ष करणार्‍या एका स्त्रीचं अत्यंत प्रभावाशाली चित्रण सरिताच्या व्यक्तीरेखेत आहे. 

Write a review

Please login or register to review