Hurhur |हुरहुर

  • ₹120/-

  • Ex Tax: ₹120/-

ही कादंबरी आकाराने लहान आहे. परंतु अतिशय संवेदनशील व आशयगर्भ आहे. नात्यातील हळुवारपणा खूप संयमाने जपला आहे. सेवानिवृत्त माणसाची ही साधी सरळ कथा नव्हे, तर माणसाने जगण्यावर, माणसांवर, नात्यांवर प्रेम कसं करावं, हे सांगणारी कथा आहे. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे यांत फक्त तेरा दिवसांतील घटना आहेत. यामध्ये दोन वृद्ध विधुरांच्या आयुष्याबद्दल तसेच एकूण बदलणार्‍या जीवनमूल्यांबद्दल चर्चा आहे. चित्रा मुद्गलांची ही कादंबरी म्हणजे जीवनातील लहान-मोठ्या संकटांवर विजय मिळविण्यासाठी घेतलेला रचनात्मक मार्गाचा शोध आहे. या कादंबरीत पत्नीच्या सहकार्याने सर्व संकटांचा सामना करणारा पुरुष जेव्हा एकटा पडतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणारं जीवघेणं एकटेपण, असमर्थता, अस्वस्थता याचं चित्रण खूप सूक्ष्मपणे केलं आहे.

Write a review

Please login or register to review