Tyanchi Jhep Tyanche Avakash |त्यांची झेप त्यांचे अवकाश

  • ₹170/-

  • Ex Tax: ₹170/-

गेल्या दीडशे वर्षांच्या काळात राष्ट्रीय पातळीवर विशेष कर्तृत्व गाजवलेल्या, विविध क्षेत्रांतल्या कर्तबगार स्त्रियांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या लेखांचा हा संग्रह आहे. १८६६ साली जन्माला आलेल्या हेमवती सेन किंवा कानेर्लिया सोराबजीपासून १९२७ साली जन्माला आलेल्या अन्नपूर्णादेवींपर्यंत आणि १९३२मध्ये मृत्यू पावलेल्या रुक्कैया हुसेनपासून २००४मध्ये मरण पावलेल्या एम. एस. सुब्बलक्ष्मींपर्यंतचा दीर्घ कालपट डोळ्यांसमोर ठेवून लेखिकेने या प्रकल्पाची आखणी केली आहे. 'सांस्कृतिक भारताच्या उभारणीसाठी' या प्रस्तावनेत लेखिकेने म्हटल्याप्रमाणे खरोखरच सांस्कृतिक भारताच्या घडणीतले या स्त्रियांचे योगदान त्यामधून स्पष्टपणे समोर ठेवले जाते.

Write a review

Please login or register to review