• Bhatkya | भटक्या

Bhatkya | भटक्या

  • ₹110/-

  • Ex Tax: ₹110/-

डॉ. श्रीधर  व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू  आहे ; मानदंडही  आहे. 
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या  तेहतीस खंडांनी  ज्ञानसागराचे  मंथन  करून  महाराष्ट्राच्या  करतालावर अमृताचा नैवेद्य  ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने  मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या  वेटोळे  घालून  बसलेल्या मराठी  कादंबरीला घनदाट अरण्याचे  रूप  दिले. 
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे  शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी  मोहित  केले 

-

भटक्या 

हरिभाऊंची आशयसीमा जिथे संपते, तिथून केतकरांची लेखनसीमा सुरु होते:
हे त्यांच्या समग्र कादंबरीविश्वाबाबत खरे आहे;
अगदी "भटक्या " (१९३८) या अपूर्ण कादंबरीबाबतही. 
पात्रमुखी  शैलीत असूनही प्रस्तुत कादंबरी  भावप्रधान  नसून चर्चाप्रधानच आहे. 
निनावी नायकाच्या देशी-परदेशी  भटकंतीतून लेखकाने कुटुंब - समाज - राजकारण  यांचा उभा छेद उभा केला आहे:
त्यातून विविध प्रसंग आणि विविध स्तरांतील पात्रे यांचे दर्शन घडते. 
आजच्या वृतान्त कादंबऱ्यांची गंगोत्री म्हणून केतकरांच्या सर्वच कादंबऱ्यांकडे - व - अर्थात - "भटक्या " कडे पाहता येईल!
- डॉ. द. भि. कुलकर्णी  

Write a review

Please login or register to review

Tags: Bhatkya | भटक्या