Eka Peksha Ek |एका पेक्षा एक

  • ₹160/-

  • Ex Tax: ₹160/-

सुधीर सुखठणकर हे आजच्या मराठी साहित्याच्या विनोददालनातील एक आघाडीचं नाव आहे. त्याचबरोबर एक सक्षम कथाकार म्हणूनही त्यांच्या लेखनाकडे पाहिलं जातं. समाजमनाला स्पर्शून जाणारा कुठलाही विषय सुखठणकरांना आपलासा वाटतो व तो कथेतून मांडण्याची त्यांची हातोटी अशी, की ते वाचकालाही आपलसं करून टाकतात. सुखठणकरांची प्रसन्न, आनंदी शैली, पुस्तकभर पसरलेले कथांतील पात्रांचे खटकेबाज तरीही सहजसुंदर संवाद सुरुवातीपासून अखेरपर्यंत वाचकाशी नातं जुळवत मस्त साथसोबत करतात. प्रस्तुत कथासंग्रहात, विवाह जमविण्याच्या पद्धतीत होत चाललेला बदल, नवरेशाहीशी झुंज देण्याची आधुनिक स्त्रीची मानसिकता, टीव्हीमालिकामय जीवन जगण्याकडे वाढत चाललेला कल, अशा विविध नावीन्यपूर्ण विषयांवरील कथांचा समावेश केलेला आहे. बँकखातेदारांची झालेली घबराट, ङङ्गब्रेकिंग न्यूज'वाल्यांचा धूमाकूळ यांचंही चित्रण आहे. सेझ, मराठी माणसाची पीछेहाटसारख्या गंभीर राजकीय, सामाजिक समस्यांभोवती कथा गुंफताना सुखठणकरांनी विषयाचं गांभीर्य तसूभरही कमी होऊ न देता वाचकांच्या चेहर्‍यावरील हसू कायम राहील याची सहजतेने दक्षता घेतली आहे. सुखठणकरांच्या लेखनाचा तो गुणविशेषच आहे. अशा विविध गुणांनी समृद्ध अशा या सर्वच कथा वाचकांना ङङ्गएकापेक्षा एक' सुंदर वाटतील, अशी अपेक्षा आहे.

Write a review

Please login or register to review