Lokshahi Aani Shikshan |लोकशाही आणि शिक्षण

  • ₹160/-

  • Ex Tax: ₹160/-

राज्यसभेचे विद्यमान सदस्य असलेले डॉ. जनार्दन वाघमारे यांचा मूळ पिंड शिक्षणतज्ज्ञाचा आहे. पाश्चिमात्य भाषांचे अभ्यासक, प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू या भूमिकेतून त्यांनी भारतातील शिक्षणपद्धतीविषयी अतिशय मूलगामी संशोधन व चिंतन केले आहे. ह्या क्षेत्रातील डॉ. वाघमारे यांची प्रयोगशीलता, चिकित्सक अभ्यास वृत्ती व एकूणच शिक्षणक्षेत्राविषयी त्यांच्याजवळ असलेली आस्था व तळमळ यांतूनच हे पुस्तक सिद्ध झाले आहे. लोकशाही, शिक्षण आणि ज्ञानाधिष्ठित समाज हे

प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. प्रत्येक माणूस हा ज्ञानाधिष्ठित समाजातला ज्ञानकर्मी बनायला हवा ह्या विचारधारेतूनच डॉ. वाघमारे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. शिक्षणाधिकाराचा कायदा हा लोकशाहीच्या दृढीकरणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तो ज्ञानाधिष्ठित समावेशी समाजाचा पाया ठरणार आहे. ज्ञानकेंद्रित समाजाची निर्मिती ही प्रबुद्ध अशा लोकशाहीतच शक्य आहे आणि नेमका हाच विचार लोकशाही आणि शिक्षणया ग्रंथात अधोरेखित झाला आहे. वाचकांना तो आवडेल.

Write a review

Please login or register to review