Samvidhan-Sabhet Dr. Babasaheb Ambedkar | संविधान-सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • ₹300/-

  • Ex Tax: ₹300/-

'जनतेचे सरकार, जनतेसाठी सरकार व सरकार जनतेचे' हा सिद्धांत आपण टिकविण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्यासाठी आपल्या मार्गात येणार्‍या वाईट गोष्टी, अडथळे ओळखण्यात वेळ दडवता कामा नये. जेणेकरून आपण आपल्या लोकांना जनतेसाठी सरकार ऐवजी जनतेचे सरकार ही भूमिका स्वीकारायला भाग पाडू. अयोग्य सरकारे हलविण्यात

आपण दुबळे राहणार नाही. हाच एक देशसेवा करण्याचा मार्ग आहे. यापेक्षा चांगला मार्ग मला माहीत नाही. २६ जानेवारी १९५० रोजी भारत एक लोकशाहीवादी देश होईल. याचा अर्थ, या दिवसापासून भारतात लोकांचे सरकार असेल, लोकांनी चालविलेले सरकार असेल व लोकांसाठी सरकार असेल. पुन्हा तोच विचार माझ्या मनात घोळत राहतो, भारताच्या लोकशाहीवादी घटनेचे काय होईल...? भारतीय लोक ही घटना अबाधित ठेवतील का...? का ही घटना नष्ट होईल...? हा विचार माझ्या मनात येतो तेव्हा मी खूप चिंताग्रस्त होतो.

Write a review

Please login or register to review