• ' Sarvamangal Kshipra ' Baddal (H.Vi.Mote Yanchya Sangrahatil Patre) |' सर्वमंगल क्षिप्रा ' बद्दल

' Sarvamangal Kshipra ' Baddal (H.Vi.Mote Yanchya Sangrahatil Patre) |' सर्वमंगल क्षिप्रा ' बद्दल

  • ₹300/-

  • Ex Tax: ₹300/-

कै .ह .वि मोटे (१९३२ - १९८४) हे मराठीतील मनस्वी आणि ध्येयवादी असे ख्यातनाम प्रकाशक . मराठी ग्रंथव्यवहारांचा इतिहास ह . वि . मोटे ह्यांना टाळून लिहिता येणार नाही . त्या दृष्टीने ' सर्वमंगल क्षिप्रा ' हे त्यांचे आत्मचरित्र अतिशय महत्वाचे आहे . हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते बहुचर्चित तर झालेच , पण त्याच वेळी समकालीन पिढीतील अनेक जाणकार व मर्मज्ञ रसिकांनी आणि साहित्य - व्यवहारातील महत्वाच्या व्यक्तींनी या आत्मचरित्राच्या  निमित्ताने जो पत्र व्यवहार केला, तो सर्वसाधारण पत्र व्यवहार नसून एक सांस्कृतिक दस्तऐवजच आहे . हा दस्तऐवज डॉ. अंजली सोमण ह्यांनी आंतरिक तळमळीने आणि वाड्मयनिष्ठेने संकलित व संपादन केला आहे . त्यामुळे तत्कालीन वाड्मयीन व्यवहार समजण्यास मदत होते . पत्र व्यवहाराची मौलिकताही ह्यातून लक्षात येते . 

पत्रे  बोलकी असतात ; ती भूतकाळाबद्दल बोलतात . त्यांना वर्तमानकाळाचा संदर्भ असतो आणि ती भविष्याचे विविधरंगी सूचन करतात . अर्थात यासाठी हवी वाचकांची ह्या पत्रांना दामोरे जाण्याची ताकद आणि आकलनक्षमता . वाचक ह्या पत्रांना भिडतील व त्यातील अनाहत नादांचा अनुभव घेतील ह्याची खात्री आहे .   

Write a review

Please login or register to review