•  Irjik |इर्जिक

Irjik |इर्जिक

  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-

इर्जिक म्हणजे समूहमनाचा आविष्कार! ग्रामजीवनातले समूहमन येथे एकवटले आहे. लोकसंस्कृती, कृषिजीवन आणि ग्रामव्यवस्था यांचा अतिशय सखोल, सशक्त आणि तेवढाच ललितरम्य आविष्कार या सर्व लेखांतून व्यक्त झाला आहे. एका अर्थाने हा ग्रामजीवनाचा सांस्कृतिक व सामाजिक दस्तऐवज आहे.

ग्रामजीवनाशी निगडित असलेल्या अनेक गोष्टींचा अरुण जाखडे यांनी मनोज्ञ परिचय घडविला आहे. प्रथम ते निसर्गाचे प्रत्ययकारी दर्शन घडवितात, नंतर निसर्गनिगडित कृषिजीवनाचे चित्रण करतात. यानंतर कृषिजीवनाशी संबंधित असलेल्या बाबींचे दर्शन घडवितात. शेती-मातीचे, कृषिजीवनाचे, सण-सोहळ्याचे आणि ग्रामव्यवस्थेचे इतके सूक्ष्म, तपशीलवार आणि रसिले चित्रण ते करतात, जे मराठी साहित्यात ङ्गार अभावाने आले आहे, कृषिजीवनातील रंग, ताल, लय, नाद, स्वाद त्यांनी अचूक टिपले आहेत.

आपल्या अनुभवाला जाखडे यांनी त्यांच्याजवळ असणार्‍या सखोल आणि चौङ्गेर ग्रंथव्यासंगाची जोड दिली आहे. त्यामुळे हे लेखन व्यासंगपूर्ण झाले आहे आणि हेच जाखडे यांचे वैशिष्ट्य आहे. जाखडे यांच्याजवळ असणारे समृद्ध भूमिप्रेम, निसर्गप्रेम ह्या सर्व लेखांतून स्पष्ट झाले आहे.

माणूस आणि निसर्ग, माणूस आणि ग्रामव्यवस्था, माणूस आणि प्राणी-पक्षीसृष्टी, माणूस आणि पंचमहाभूते यांच्या नात्याचा अरुण जाखडे यांनी समूळ शोध घेतला आहे.

एका भूमिपुत्राचे हे इर्जिक म्हणूनच स्वादिष्ट झाले आहे.


१) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

२) मुंबई वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई

या संस्थांचे मराठी वृत्तपत्रांतील २००९ वर्षातील सर्वोत्कृष्ट कॉलमसाठी पुरस्कार प्राप्त झाले.

३).महाराष्ट फाऊंडेशन (अमेरिका) संस्था यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार (2016)


(प्रकाशक :- लोकवाङ्मय गृह) Write a review

Please login or register to review